रियांश मल्टीट्रेड प्रा.लि.संगमनेर तर्फे आषाढी एकादशी निमीत्त वृध्दाश्रमाला भेट व फराळ वाटप

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आषाढी एकादशी चे औचित्य साधुन दि.29/6/23 ला रियांश मल्टीट्रेड प्रा.लि.जिल्हा यवतमाळ व विविध तालुक्यातील शाखेच्या वतिने कळंब तालुक्यातील धोतरा येथील वृध्दाश्रमालाभेट देण्यात आली. या शुभदिनी सामाजिक बांधिलकी समजून वृद्धाश्रमातील सर्व वृध्दांना व भेटी साठी येणाऱ्या सर्व बांधवाना साबुदाणा खिचडी,फळे व फराळाचे पॅकेटचे वाटप करण्यात आले.आषाढी एकादशीच्या निमित्तानं रियांश मल्टीट्रेड ह्या कंपनीने एक नवीन पाऊल उचललं आहे,ह्यामध्दे सामाजिक हित,रुढी परंपरा,भारताची संस्कृतीचे अस्तित्व टिकविण्याचे कार्य करित आहे,ह्या कंपनीने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले आहे.हि संकल्पना रियांश मल्टीट्रेड कंपनीचे ओनर CMD श्री.मधुकरजी जाधव सर यांनी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचा संकल्पना पासुन प्रभावित होवुन,, स्वस्थ भारत अभियान व आत्मनिर्भर भारत अभियान ह्या मध्दे एक छोटा सा खारीच्या वाट्याचे प्रयत्न केले आहे.
ह्या कंपनीने फार कमी कालावधीत प्रसिध्दी मिळाली आहे .तसेच आयुष्यमान मंत्रालया कडुन ही प्रमाण पत्र देण्यात आले आहे,ह्याचाच एक छोटासा पाऊल आपल्या विदर्भातील जिल्हा यवतमाळ मधील,श्री.गजानन देवतळे,श्री.किशोर धांदे,श्री.कविश्र्वर भगत,सौ.माया भोयर,सौ.ज्योत्सना बोबडे व डिस्ट्रीब्युटर ह्यांनी हा कार्यक्रम संपन्न केला आहे.