
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव चे बॅंक प्रतिनिधी म्हणून जेष्ठ पत्रकार प्रकाशजी देवकृष्ण मेहता यांची नियुक्ती एका आदेशान्वये करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळाच्या झालेल्या विशेष सभेत प्रकाश मेहता यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होतआहे..
आपल्या नियुक्ती चे श्रेय माजी शिक्षण मंत्री प्रा वसंतरावजी पुरके,काँग्रेस जिल्हाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव चे सभापती ॲड प्रफुल्लभाऊ मानकर व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालिका सौ वर्षाताई राजेंद्र तेलंगे व सर्व काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ता मंडळी यांना देत आहे.
