वडगाव यवतमाळ मधील रोडची झाली दुर्दशा

यू

.
सविस्तर वृत्त
यवतमाळ नगरपालिकेच्या हद्दीत येणार वडगाव येथील रहदारीच्या रोडची झाली दुर्दशा वडगाव हे पहिले ग्रामपंचायतच्या हद्दीत येत होते त्यावेळेस ग्रामपंचायत या रोडची दुरुस्ती करत होते त्यामुळे कुठल्याही प्रकारचं पाणी साचत नव्हते नागरिकांना येण्या-जाण्याकरिता हा रोड सुरळीत होता पण जेव्हापासून वडगाव हे नगरपालिकेच्या हद्दीत गेलं तेव्हापासून मात्र या रोडची दुर्दशा झाली येथील नागरिकांनी नगरपालिकेला. व नगरसेवकाला वारंवार तक्रार करून सुद्धा या रोग की दुर्दशा मात्र कायमच आहे प्रशासनाचं काही लक्ष नाही असं नागरिकांनी मत व्यक्त केलआहे त्यामुळे वडगाव येथील नागरिक यांनी राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यांची भेट घेऊन या वर्दळ असलेल्या रस्त्याची व्यथा सांगितली नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्ते त्यांनी या रोडची पाहणी केली असता वडगाव मधील रोड पूर्ण चिखलमय झाला दिसला रोडवर व्यवस्थित चालायला रस्ता सुद्धा नाही त्याच शाळेची मुले येणं जाणं करतात वर्दळीचा रस्ता असल्याकारणाने. सारखे दुचाकी आणि फोर चाकी वाहने जाणे येणे करत असतात संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यांनी रोड बाबतची व्यथा नगरपालिकेला व नगरसेवकाला कळविली वडगाव मध्ये जी समशानभूमी आहे त्यामधील येणार पाणी याचा ताबडतोब बंदोबस्त करावा असे संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यांनी नगरसेवक व नगरपालिकेला फोन द्वारे कळविले आहे त्यामुळे हा रोड खराब होतोय येण्या-जाण्याकरिता रस्ता राहत नाही असा पाठपुरावा करून नगरपालिका माहिती देण्यात आली नगरपालिकेने यावर गांभीर्याने लक्ष घालून या रोडवर ताबडतोब मुरूम टाकण्यात यावा अन्यथा वडगाव मधील नागरिक व संघटनेचे अध्यक्ष कार्यकर्ते आम्ही सर्व नगरपालिकेवर मोर्चा आणू असा इशारा दिला.