
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सेट्रीज संस्था, यवतमाळ टिम यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी व शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी मोफत फळबाग लागवड या विषयावर कार्यशाळेचे आयोजन ग्राम पंचायत हॉल, वरध ता राळेगाव जि यवतमाळ येथे दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत करण्यात आले.या कार्यशाळेत कृषी तज्ञ आबा लाड सर (सातारा), यांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आवश्यक असलेले तांत्रिक मार्गदर्शन केले. यामध्ये योग्य जमीन निवड, दर्जेदार रोपांची निवड, लागवड पद्धती, ठिबक सिंचनाचे महत्त्व, सेंद्रिय खतांचा वापर तसेच कीड व रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यशाळेस परिसरातील 72 नोंदणीकृत शेतकऱ्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमामुळे अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळण्यास प्रोत्साहित झाले असल्याचे दिसून आले. प्रमुख उपस्थिती
गंगाधर स्वामी सर PM (कर्नाटक), संजय वडस्कर सर PO (यवतमाळ)
कार्यशाळेचे आयोजन व नियोजन FC प्यारे जगताप, FC दशरथ शिंदे राळेगाव व सेट्रीज टिम, यवतमाळ यांनी केले.
