
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
बोराटी जंगल परिसरात रविवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान राळेगाव येथील आरडी एजंट निलेश खडसे हे सकाळी राळेगाववरून मोहदा येथे कारने जात असताना वरुड आणि बोराटी च्या मध्योमध जंगलात दुसऱ्या नाल्याजवळ एका मंदिराजवळ निलेश खडसे व त्यांच्या वडिलांना वाघ दिसला ही माहिती गावकऱ्यांना मिळताच भीतीचे वातावरण पसरले होते.निलेश खडसे हे जात असताना यांच्या माहितीनुसार, सुरवातीला वाघ एका खड्ड्यात बसलेला होता. कारचा आवाज आल्यानंतर तो तेथून निघाला, पण त्याने कारवर कोणताही अटॅक केला नाही. तो बोराटीमार्गे जंगलामध्ये पुढे गेला. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे खडसे पिता-पुत्र वाघाला पाहत होते. त्यांनी कारमधून काही फोटो सुद्धा काढले. काही वर्षांपूर्वी याच परिसरामध्ये टी वन अवनी पहिला बळी घेतला होता याच अवनी वाघिणीने उच्छाद मांडलेला होता. त्यावेळी वाघीणीच्या हल्ल्यात डोंगर परिसरातील तेरा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. नंतर त्या वाघीणीला ठार मारण्यात आले होते. आता पुन्हा एकदा परिसरात वाघाचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरली आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
