आष्टोणा, मंगी,दहेगाव, रोडचे काम कासवगतीने ,संबंधित ठेकेदाराची उद्धट भाषेत प्रतिक्रिया दिल्या

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील आष्टोणा फाटा ते आष्टोणा, मंगी दहेगाव या रोडचे काम हे मागील एक,दिड वर्षापासुन सुरु झाले आहे पण या रोडचे काम हे अत्यंत कासवगतीने सुरु असल्यामुळे या परीसरातील नागरीकांना व पेंशन्टला उपचाराकरिता नेण्याकरिता खुप त्रास सहन करावा लागत आहे. मागील पावसाळ्यात याच रोडवर मातीमिश्रीत मुरम टाकला होता तेव्हा पावसाळा असल्यामुळे त्या मातीमिश्रीत मुरमामुळे अनेकवेळा मोटरसायकल स्वार परीवार मोटरसायकल स्लिप होऊन अनेक नागरिकांचे हातपाय पण मोडलेले आहे.आता तर या रोडवरील टाकलेली गिट्टी ही निघालेली असल्यामुळे साधे पायदळ किंवा मोटरसायकल चालवितांना मोटरसायकल चालाकाची दमछाक होत आहे यातच एकाद्या पेशन्टची तब्बेत जर बिघडली तर कुठलेच वाहन या गिट्टी निघालेल्या रोडने जाण्यात तयार नसते.त्यामुळे त्या रुग्नांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रोडचे कासवगतीने करण्यात येणारे काम हे तातडीने पुर्ण करुन आष्टोणा, मंगी,दहेगाव परीसरातील नागरीकांची तसेच शाळेच्या विध्यार्थ्यांचे म्हणणे होत असल्याचे दिसुन येत आहे.

आष्टोना मंगी दहेगाव रोडचे काम एक वर्षापासून कासवगतीने सुरू या रोडची गिट्टी निघाली आहे अनेक अपघात सुद्धा झाले आहे तर संबंधित ठेकेदाराला काम केव्हा सुरू करता म्हणून विचारणा केल्यास उद्धट भाषेत बोलतात तेव्हा प्रशासनाने या ठेकेदारावर कारवाई करुन रोडचे काम लवकर मार्गी लावावे अशी मागणी आष्टोना मंगी दहेगाव येथील नागरीक करित आहे

शुभम पायघन सामाजिक कार्यकर्ते मंगी