पिकाची अवस्था पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू

सहसंपादक : रामभाऊ भोयर

गेल्या 40 दिवसा पासून राळेगाव शहरासह तालुक्यात पाऊस कोसळतो आहे या पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले असून सद्यस्थितीतील पिकाची अवस्था पाहून शेतकऱ्यांना रडू येत आहेत अशी प्रतिक्रिया नुकतीच एका शेतकऱ्यांनी दिली शेतकरी खर्च करून बरबाद झाला आहेत असेही या शेतकऱ्याचे म्हणणे आहेत .गेल्या 40 दिवसापासून तालुक्यामध्ये पाऊस कोसळतो आहेत या पावसामुळे संपूर्ण शेत जलमय झाले आहेत चिपडले आहेत शेतात तणाचे साम्राज्य आहेत पिक पिवळी पडली आहेत सद्यस्थितीत ऑगस्ट महिना सुरू आहेत या महिन्यांमध्ये पिकाची अवस्था ही टोंगळवर पाहिजे होती पण पीक मात्र अजूनही टिचभर आहे हे पीक केव्हा मोठे होईल व त्या पिकाला केव्हा पातीफुल बोंड येथील हा प्रश्नच आहे बहुतांश शेतातील तुरी नष्ट झाल्या आहेत शेतात कुठलेच काम होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत शेतात तणाचे एवढे साम्राज्य आहेत की नींदन करण्यासाठी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहेत खताचे दिलेले डोस हे पाण्यात वाहून गेले आहेत शेतातील पिकाची ही अवस्था पाहून शेतकऱ्यांना रडू येत आहे शेतकरी आपल्याकडील संपूर्ण रक्कम शेतात लावून बसला आहे आणि पिकाची जे भविष्य आहे ते अधांतरी दिसत आहेत एवढे होऊन अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नाही शेतकऱ्यांना मातीत घालूनच पाऊस थांबेल की काय असे शेतकऱ्यांना वाटत आहेत या स्थितीमध्ये एक तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी हेक्टरी भरीव सरसकट मदत द्यावी तसेच पिक विमा द्यावा ह्या उपाययोजना केल्यासच शेतकरी भविष्यात तग धरतील अन्यथा तालुक्यात निश्चितच शेतकरी आत्महत्या वाढतील लाडक्या बहिणीच्या पाठीमागे असलेल्या शासनाने संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी लाडका शेतकरी योजना आणून भविष्यात शेतकरी उभा होण्यास सहकार्य करावे अशी आशा सर्व सामान्य शेतकरी मायबाप सरकारकडे व्यक्त करीत आहे