चाचोरा येथे वनराई बंधारा केला निर्माण

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील चाचोरा येथे जनावरांच्या पिण्याचे पाणी तसेच शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गावकऱ्यांनी नाल्यावर वनराई बंधारा बांधला.यावेळी तालुका कृषी अधिकारी जोशी साहेब,कृषी सहाय्यक मसाळ साहेब,सरपंचा सौ.शालिनीताई तोडासे, मनसे तालुका उपाध्यक्ष सुरज लेनगुरे, ग्रा.पं. सदस्य रविभाऊ मांदाडे,संदिप गुरनुले, श्रीकांत कावडे, धिरज मांदाडे, संतोष गुरनुले यांच्यासह गावकऱ्यांनी वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले.