
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या खैरी गावातील पूर्व दिशेस असलेल्या स्मशानभूमीत प्रेतयात्रा नेतांना नाला ओलांडून जावे लागते. परंतु आल्यावर पूल नसल्यामुळे प्रेतयात्रा नेत्यांना ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नाल्याच्या पलीकडे स्मशानभूमी असल्याने पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास पूर ओसरेपर्यंत अंत्ययात्रा थांबवावी लागते. त्यामुळे मरणानंतरही येथील नागरिकांना मरण यातना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र आहे.
तसेच या स्मशानभूमीला लागून खैरी धानोरा रीठ हा शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदन रस्ता असून त्या मार्गाने जाणाऱ्या शेतकरी बांधवांना नाल्यावरील पूर ओसरेपर्यंत आपली शेती कामे करावयाची थांबवावी लागतात. व अंत्ययात्राही पूर् ओसरेपर्यंत थांबवावी लागतात. तसेच यावर्षी अतिवृष्टीमुळे या नाल्याला वरचेवर पूर येत असल्यामुळे अनेक प्रेतयात्रा नेत्यांना वेळेवर अंत्यविधी होणे ऐवजी पूर ओसरल्यावर अंत्यविधी करावा लागत आहे. याचा त्रास मृतकाला मरणोत्तर सुद्धा होत आहे तसेच अंत्ययात्रेत सहभागी ग्रामस्थांनाही खूप होत आहे. तसेच प्रेतयात्रा नाल्यातून येताना खूप त्रास होत असतो.
त्यामुळे ह्या नाल्यावर कायमस्वरूपी पुलाची मागणी गावकऱ्याकडून होत आहे. या आधी सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने या नाल्यावरील पुलाच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींना देण्यात आले परंतु या मागणीकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. तरी या स्मशानभूमी कडे जाणाऱ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम त्वरित मंजूर करून देण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
