
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राष्ट्रीय कन्या दिनाच्या निमित्ताने मुलीच्या जन्माचा सन्मान त्यांची सुरक्षितता आणि जगण्याच्या हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. यावर्षी २५ सप्टेंबर रोजी हा दिवस राष्ट्रीय कन्या दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे.
घर जपलेले झाड ;
फांदी फांदी जिवापाड;
भावबंध माया रीत; त्याच्या मनाची कवाड;
लेक माहेराच सोन;
लेख सौखाचं औक्षण; लेक बासरीची धून;
लेक अंगणी पैंजण;
या भावास्पर्शी गीता मधून लेकीच्या कुटुंबातील महत्त्व सांगणाऱ्या गीता बरोबरच मुलगी ओझे नाहीतर जबाबदारी आहे ती कर्तबगार आणि रणरागिनी देखील आहे असे अनेक संदेश रविवारी सोशल मीडियावर हळव्या पोस्ट दिसत होत्या दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी होणारा राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो तर काही देशांमध्ये २८ तारखेला देखील हा दिवस साजरा होतो सासर आणि माहेर अशा दोन्ही ठिकाणी मुलगी कुटुंबाचा महत्त्वाचा घटक असते तिच्या अस्तित्वाचे महत्व कायम राहावी यासाठी तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो या दिवशी लेकीला भेट वस्तू देऊन तिचा आदर राखला जातो कन्या दिनाच्या औचित्य साधून अनेक कुटुंबीयांनी रविवारचा दिवस खास मुलगी आणि सुनेसाठी साजरा केला. शहरात या सोहळ्याचे क्षण कौटुंबिक वातावरणात साजरे झाले असले तरी सोशल मीडियावर मुली विषयाच्या भावना प्रकर्षाने प्रकट झाल्या मुलगी ओझं नाही तर जबाबदारी आहे मुलगा वारस तर मुलगी पारस आहे मुलगी म्हणजे चैतन्य मुलगी म्हणजे आनंद मुलगी म्हणजे मायेचा पाझर असते बापाचा आधार असते मुलगी ही जन्मदाती आहे हे निसर्गाचं चक्र मुली शिवाय अपूर्ण आहे तिच सुरवात आणि सुरवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे. अशा अनेक पोस्ट करून अनेकांनी त्यांच्या लाडलीचे फोटो शेअर केले बालपणीपासून ते लग्न सोहळ्यापर्यंत चे फोटो टाकून भावनिक पोस्ट टाकल्या लेकीच्या जन्माचे स्वागत करणारे संदेशही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले ज्यांना मुली आहेत अशांना भ्रमणध्वनीद्वारे तसेच मुलीची इमेज टाकून शुभेच्छा देखील देण्यात आले आहे.
