
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक 24/11/2021 रोजी आदिम जमात शामदादा कोलम संघटन राळेगाव तालुका अध्यक्ष नीलेश रामकृष्ण पिंपरे यांनी दिले निवेदन..आदिवासीं विद्यार्थ्यासाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा मार्फत आदिवासीं विद्यार्थ्याना मोफत पोलिस भर्ती प्रशिक्षण मिळावे अशी योजना राबण्यासाठी दीले निवेदन स्पर्धा परीक्षेच्या काळात स्पर्धा अधिक वेगवान होत आहे व या स्पर्धेत आदिवासी जमातीच्या विद्यार्थ्यांना पोलिस प्रशिक्षणाची नितांत गरज आहे व ते मिळाल्यास त्याचा फायदा पुढे होणाऱ्या मेघा पोलिस भर्ती मध्ये होवू शकते. खाजगी प्रशिक्षण वर्गाचा खर्च हा खूपच जास्त असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या आदिवासी जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे कठीणच आहे.. त्यामूळे माननीय प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांना पोलिस भर्ती प्रशिक्षणासाठी लवकरात लवकर ही योजना राबविण्यात यावी अशी मागणी आदिम जमात शामादादा कोलम संघटनेच्या वतीने निलेश दौलत रोठे, अमित सूर्यभान ढोबळे समीर लहनुजी कोंडेकर आकाश शिवाजी टेकाम ध्यानेश्वर जयदास मेश्राम चिंटू रामकृष्ण जांभूळकर आकाश भीमराव टेकाम स्वप्नील द. आत्राम व सपना सुनील मेश्राम इत्यादी विद्यार्थ्यांच्या उपस्थीत बिरसा क्रांती दलाचे यवतमाळ तालुका अध्यक्ष मेजर जीवन कोवे ह्याच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले.
