
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथील रहिवासी असलेले शिक्षक हरिदास महादेव वैरागडे यांनी अनेक वर्षांपासून राळेगाव पंचायत समितीमध्ये शिक्षक म्हणून काम केले असून सुरवातीला दहा वर्षे सहाय्यक शिक्षक म्हणून काम केल्यानंतर पंधरा वर्षे पदवीधर शिक्षक त्यांनी कार्य केले त्यानंतर राळेगाव तालुक्यातील वरध केंद्रामध्ये चार वर्षे प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असतांनाच त्यांची पदोन्नती होऊन राळेगाव तालुक्यातील खैरी केंद्रात कायमस्वरूपी केंद्रप्रमुख म्हणून रूजू झाल्याबद्दल राळेगाव तालुक्यातून व मित्रपरिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.