अखिल भारतीय सरपंच परिषदेची वरोरा तालुका कार्यकारणी गठीत,तालुका अध्यक्ष पदी विशालभाऊ पारखी यांची निवड

वरोरा पंचायत समिती सभागृहात अखिल भारतीय सरपंच परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अध्यक्ष म्हणून जिल्हाअध्यक्ष राजेंद्र कराळे. तर प्रमुख उपस्थिती विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड देवा पाचभाई जिल्हा कार्यकारणी सदस्य नर्मदाताई बोरेकर उपस्थित होते. वरोरा तालुका मधील सर्व सरपंच यांच्या सहमतीने दहेगाव ग्रामपंचायतचे सरपंच विशाल पारखी यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वरोरा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.तर सचिव म्हणून शंकर मडावी. कार्याध्यक्ष नितीन खंगार. उपाध्यक्ष सुचिता ठाकरे. संघटक देवानंद महाजन. समन्व्यक नीता बोढाले. सहसचिव चंद्रकला वनशिंगे.यांची निवड करण्यात आली बैठकीला सरपंच गणेश चवले रविंद्र भोयर निखिल हिवरकर विजय ननावारे दीपक भालशंकर प्रतिभा मांडवकर रुपवंती दरेकर ज्योती पोयाम सपना चायकाटे परचाके मॅडम व वरोरा तालुका मधील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते .
अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायतीच्या सर्वागीण विकासा करिता काम करणार असून संघटनेचे मार्फत सरपंच उपसरपंच व सदस्य यांना त्यांचे अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देऊन शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटका पर्यत पोहचविण्याचा मुख्य हेतू असल्याचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष विशालभाऊ पारखी यांनी सांगितले.