
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव, दि. २२ डिसेंबर २०२५ :
इंदिरा गांधी कला महाविद्यालय येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन गणित विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. ए. वाय. शेख होते.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. एस. व्ही. गोरे, सहाय्यक प्राध्यापक, गणित विभाग यांनी आयोजनाची जबाबदारी पार पाडली. त्यांनी राष्ट्रीय गणित दिनाचे महत्त्व स्पष्ट करत गणित विषय हा तार्किक विचार, विश्लेषण क्षमता व समस्या सोडविण्याचे कौशल्य विकसित करणारा असल्याचे प्रतिपादन केले.
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आंतरमहाविद्यालयीन e-Quiz स्पर्धेचे संयुक्त आयोजन करण्यात आले. ही e-Quiz स्पर्धा लोकमान्य टिळक महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव, यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय मंगरुळपीर आणि इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव यांच्या गणित विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. या e-Quiz स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या स्पर्धेसाठी संयोजक (Convenors) म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथील प्रा. महादेव जी. भुजाडे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील प्रा. अक्षय पी. जेणेकर, इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथील डॉ. अल्फ्रेड वाय. शेख तसेच यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथील डॉ. किशोर एस. वानखडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. पी. ए. खानझोडे, डॉ. ए. एन. घारडे, डॉ. ए. वाय. शेख व डॉ. राहुल एन. सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी गिरी हिने केले तर आभारप्रदर्शन शिवानी मेश्राम हिने केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला.
