
वणी :नितेश ताजणे
वसंत जिनिग अँड प्रेसिंगच्या
अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. प्रमोद वासेकर की संजय खाडे? अशी चर्चा असतांनाच अखेर अध्यक्षपदी आशिष खुलसंगे यांची निवड पक्षश्रेष्ठींनी केली आहे.
वसंत जिनिंग अँड प्रेसिंग ची निवडणूक अटीतटीची झाली होती. तिहेरी झालेल्या या लढतीत माजी आमदार वामनराव कासावर यांच्या परिवर्तन पॅनलने शेवटच्या क्षणी बाजी मारली आणि १७ पैकी १५ उमेदवार निवडून आणले होते.
या निवडणुकीत काँगेस पक्षाचे धुरंधर नेते निवडून आले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालायची याचा पेच पक्षश्रेष्ठींना पडला होता. प्रमोद वासेकर, संजय खाडे व पुरुषोत्तम आवारी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती मात्र पक्षश्रेष्ठींच्या मनात काही वेगळच होतं.
मंगळवारी दि.२२ नोव्हेंबर ला वसंत जिनिंच्या हॉल मध्ये अध्यक्षाची निवड प्रक्रिया पार पाडली.
या बैठकीत आशिष खुलसंगे यांचे नाव अध्यक्षपदा करिता ठरविण्यात आले. तर उपाध्यक्ष पदी जय आबड यांची वर्णी लागली असून कार्यकारी संचालक पदी प्राध्यापक शंकर वऱ्हाटे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे अशी माहिती मिळाली.
