स्व. वामन बापू इंगोले यांची पुण्यतिथी साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

सावरखेड:आज दिनांक 16 डिसेंबर 2022 ला स्व. वामनराव बापू इंगोले यांची 6 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राजीव गलांडे हे होते तसेच गावातील सरपंच, उपसरपंच व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वर्गीय वामनबापू यांचा पुतळा गावांमध्ये बसविण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला व समिती गठीत करण्यात आली.राजुभाऊ मेश्राम (अध्यक्ष),
शशिकांतजी मिरझापूरे( उपाध्यक्ष),
नारायणराव हिवरकर (सचिव),
रजनीकांतजी फुटाणे( कोषाध्यक्ष),
बाळासाहेब इंगोले (मार्गदर्शक) , सदस्य -विजय राव धुळे,तुळशीरामजी उरकुडे,मोतीबाबाजी पौराते, लेतूजी जुनघरे,विनायकराव धांदे, अनिलरावजी दुर्गे,ज्ञानेश्वरराव जांभुलकर,तुळशीरामजी दुधकोहळे, राजुभाऊ तेलंगे, दिपकभाऊ दुधकोहळे,शामरावजी कुडमते,श्रीकांतजी फुटाणे संदीपराव मेश्राम ,मंगेश आत्राम हे आहेत.
पुतळा उभारणीच गाव वर्गणीतुन करण्यात येणार आहे, तरी गावातील नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येतं आहे.