
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत, यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य तथा राज्य ग्रंथालय संघाचे पदाधिकारी डॉ अशोक सखुबाई बालाजी फुटाणे यांची कन्या कुमारी वसुधा रेखा अशोक फुटाणे,वडकी हिने प्रथम क्रमांकावर नाव नोंदवले. आदिवासी विभाग ग्रंथालय पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षे मध्ये मुली मधून प्रथम क्रमांक मिळवला.
शासकीय आदिवासी आयुक्त कार्यालय नागपूर विभागात ग्रंथपाल या पदासाठी नियुक्ती करण्यात आली.विविध सामाजिक संघटनाच्या वतीने तथा ग्रंथालय संघटनेच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. पुढील तिच्या या यशामागे असलेल्या मेहनत, चिकाटी आणि समाजांचे संस्कार हे सर्वांना प्रेरणादायी ठरणारे आहेत. भविष्यातही ती आणखी उच्च शिखरे गाठो. अश्या प्रकारे शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.
