
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने 12ते 24जुलै दरम्यान शिव संपर्क अभियान संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने दी .18/7/2021 ला धानोरा सर्कल मध्ये येवती येथे शिव संपर्क अभियान व आढावा बैठक घेण्यात आली .कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा प्रमुख राजेन्द्र गायकवाड , वसंतराव कंगाले सर राळेगाव तालुका प्रमुख विनोद काकडे यांच्या मार्गदर्शनात शिव संपर्क मोहीम व आढावा बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.नेहमी शिवसेना 80टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या विषयाला अनुसरुन शेतकऱ्यांचे ,विद्यार्थ्यांचे व आरोग्याचे समान्य जनतेचे कोणतेही प्रश्न असो ते सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहे असा विश्वास सामान्य जनतेत या शिव संपर्क मोहीम माध्यमातून या वेळी करण्यात आला.
या कार्यक्रम ला उपस्थित शिवसेना उपतालुका प्रमुख प्रशांत वारेकर, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ वर्षा ताई मोघे, मनोज भोयर, विरेंद्र मोघे, युवासेना उप तालुका प्रमुख वृषभ दरोडे ,विभाग प्रमुख निखील देठे, माजी विभाग प्रमुख किशोर वाघ, निलेश कुबडे, रामदास कोल्हे, मधुकर पाथरकर ,नथ्थुजी वाघ, सौरभ मराठे, गोपाल मडावी ,निकेश वाल्दे, सुरज जुमनाके ,अजय पढाल ,विशाल सेवेकार ,अशोक धोटे ,प्रल्हाद कोरांगे, व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
