.

सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र शासन महा राजस्व अभियान अंतर्गत राळेगाव येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स मध्ये समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात लाडकी बहीण योजनेअंतर्गत शेवटच्या बहिणीचे नोंदणी झाल्याशिवाय मी येथून रात्रीचे बारा वाजले तरी जागेवर हटणार नाही अशा प्रकारची घोषणा क्षेत्राचे आमदार डॉ अशोक उईके यांनी केली शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत स्थानिक त्रिमूर्ती मंगल कार्यालयात महा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्व शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी आणून लाभार्थ्यांना एकाच दिवशी त्यांची नोंदणी झाल्याशिवाय कोणीही जागेवर हलू नये अशा प्रकारची ताकीद सर्व अधिकाऱ्यांना आमदार उईके यांनी दिली लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एकाच ठिकाणी आधार कार्ड नियोजन. बँक खाते उघडणे या योजने करता लागणाऱ्या विविध कागदपत्रांची जुळवाजवळ करण्याकरता महसूल विभाग व इतरही योजनांना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याकरता अधिकाऱ्यांना रात्री दहा वाजले तरी चालेल परंतु लाभार्थ्यांना येथेच त्यांच्या शंकांचे निरासन करा अशा सूचना याप्रसंगी देण्यात आल्या होत्या तसेच 1990 नंतर ज्यांनी शेतीवर अतिक्रमण करून शेती राबत आहे त्यांच्या नावाने हक्काचे पट्टे महसूल विभागाने ठराविक कालावधीत देण्याच्या सूचना या प्रसंगी त्यांनी केल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँक खाते उघडलेल्या नव लाभार्थ्यांना त्यांचे कार्ड याप्रसंगी वाटप करण्यात आले ही योजना फसवी नसून विरोधक ही योजना फसवी असल्याचा टाहो फोडत आहे याकरिता माझ्या बहिणींनी ही योजना कायमस्वरूपी राहील अशा प्रकारची ग्वाही आमदार उईके यांनी दिली कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे शहराध्यक्ष डॉ कुणाल भोयर संजय काकडे प्रशांत तायडे अशोक थोडगे तहसीलदार अमित भोईटे गटविकास अधिकारी केशव पवार मुख्याधिकारी अनुप अग्रवाल ठाणेदार सीताराम मेहत्रे यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्व कार्यालयाच्या स्टॉलवरून लाभार्थी ना मार्गदर्शन त्यांच्या कागदपत्राची पूर्तता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते याप्रसंगी सर्व कर्मचारी व लाभार्थ्यांकरिता भोजनाची व्यवस्था ही करण्यात आली होती
