आयुष्यात बी प्लॅन तयार ठेवा – मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर

जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

हस्तलिखित नोट्स काढा

ध्येय निश्चित करून वाटचाल करा

तालुका प्रतिनिधी/१० सप्टेंबर
काटोल : स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतांना अभ्यासाचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.पदवी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी न करता.पदवीचे शिक्षण घेत असतांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तर यशाला गवसणी घालता येईल.असे प्रतिपादन नागपूर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्र, काटोल येथे ‘ग्रेट भेट’ या उपक्रमानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना केले.
मानव विकास कार्यक्रम व विदर्भ विकास मंडळ अंतर्गत जि.प.नागपूर द्वारा संचालित जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल माजी गृहमंत्री अनिलबाबू देशमुख यांच्या प्रयत्नाने व जि.प.सदस्य सलिलदादा देशमुख व जि.प.चंद्रशेखरजी कोल्हे यांच्या सहकार्याने सुरू झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, तर प्रमुख अतिथी जि.प.सदस्य चंद्रशेखर कोल्हे, पं. स.सदस्य संजय डांगोरे, गट विकास अधिकारी संजय पाटील, गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड, कार्यकारी अभियंता राकेश वाघमारे, सहा.अभियंता तुलाराम तलमले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे कुंभेजकर म्हणाले, जीवनात ध्येय निश्चित करून त्याकरिता प्रयत्न करा.आयुष्याचा बी प्लॅन तयार करून ठेवा.एकाच परिक्षेवर अवलंबून न राहता त्यासोबत इतरही परीक्षा देत रहा.ग्रामीण भागात प्रचंड बुद्धिमत्ता लपलेली आहे.त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातून अधिकारी निर्माण होतील.हस्तलिखित नोटस काढण्यावर भर दया.स्पर्धा परीक्षेत इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे.म्हणून इंग्रजीत संवाद वाढवा.
शिक्षक दिन निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत अनुक्रमे पाच क्रमांक प्राप्त करणारे रुचिता नासरे, अक्षय कावटे, गुंजन रिठे, स्वर्णा कोटजावळे, हिमांशी भोरे यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रसंचालक दिनेश धवड, संचालन केंद्रसमन्वयक राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक ऑपरेटर सतिश बागडे व परिचारिका अनुसया रेवतकर आदींनी सहकार्य केले.