
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय जनता पक्षाच्या वतीने राळेगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड. प्रफुलसिंह चौहाण प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भाजप कार्यालयात मौन पाळून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, प्रशासनातील अनुभव तसेच राज्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा उपस्थित मान्यवरांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राजुरकर यांनी केले. कार्यक्रमास भाजपाच्या तालुका अध्यक्ष सौ. छायाताई पिंपरे, शहर अध्यक्ष शुभम मुके, माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे, ज्येष्ठ नेते श्रीरंग चाफले, काकडे काका, दिलीपराव काळे, सचिनसिंह चौहाण, बाळासाहेब दिघडे, श्रीमती उषाताई भोयर, डॉ. सविता ताई पोटदुखे, प्रशांत तायडे, अभिजीत कदम, आशिष इंगोले, अशोक वर्मा, नज्जूभाई शेख, रुपेश बोरकुटे, अभिजित काळे, अरुण शिवणकर, संदीप पेंदोर, करुणा ताई वानखेडे, शीतल ताई राऊत, विद्या ताई मेश्राम, एड्सकर ताई, ओम तायडे, दिनेश करपते, कार्यालयीन प्रमुख सौरभ खडस्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“अजितदादा पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. पक्षीय मतभेदांपलीकडे जाऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही लोकशाहीची खरी ताकद आहे. त्यांच्या कार्याची आठवण ठेवत समाजहित व राष्ट्रहितासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे,”
अँड. प्रफुलसिंह चौहाण
जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी
कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
