“नेताजी विद्यालय” राळेगाव चा कबड्डी संघ(मुले) तालुका स्तरावर ‘अजिंक्य

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

दि 23/11/2022 रोजी मार्कंडेय पब्लिक स्कुल बरडगाव येथे आयोजित तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत नेताजी विद्यालय राळेगाव च्या संघाने अंतिम सामन्यांमध्ये लखाजि महाराज विद्यालय झाडगावचा पराभव करून जिल्हास्तरावर धडक दिली. क्रीडा व्यवस्थापक म्हणून श्री व्ही आर कुबडे यांनी काम पाहले,तसेच सचिन पांडे यांचे सहकार्य लाभले, उत्कृष्ट खेळ करण्यासाठी शाळेचं मुख्याध्यापक श्री पी पी ओंकार सर यांनी विशेष मार्गदर्शन केले.जिल्हास्तरावर निवडीसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ एन पी इंगोले व सचिव मा. विजयराव तायडे तसेच सहायक शिक्षक श्री पी एस वासेकर, कु एम ए केवटे, कु आर डि सिडाम,कु एस एस चावट, कु एम डी सोनोने,कु एम बी नागरे, कु एस बी वानखडे श्री एम एन बोरकुटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.