
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्जाच्या जाचक अटी लादून शेतकऱ्यांना बँक थेट कर्ज वाटप करणार असल्याने ही कर्ज वाटप प्रक्रिया थेट बँकेमार्फत न करता ग्राम विविध सहकारी संस्थेच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटप करण्या यावे या आशयाचे निवेदन दिं ४ मे २०२४ रोज शनिवारला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ याना देण्यात आले आहे. आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनिष्ट तफावत असणाऱ्या ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेला वगळून थेट सभासदांना कर्ज देण्याचे धोरण अवलंबल्याचे कळते. यामुळे सहकार चळवळीचा कणा असणाऱ्या ग्राम विविध कार्यकारी संस्था नामशेष होतील. अनेक वर्षांपासुन शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या संस्थांवर अशा प्रकारे कुऱ्हाड चालवल्यास गावागावातील सहकारी चळवळ संपुष्टात येईल, त्यामुळे घेतलेला निर्णय मागे घेऊन ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातूनच शेतकरी सभासदांना लवकरात लवकर या वर्षीच्या खरीप हंगामाचे पिक कर्ज वाटप करावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले असून यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड,प्रफुल मानकर तालुका अध्यक्ष राजू तेलंगे,बाजार समितीचे संचालक सुधीर जवादे,वसंत शेटे,रवींद्र निवल, सरपंच मोहन नरडवार,धनंजय जवादे,अमृत पाझारे आदी उपस्थित होते
