
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य सचिन ठमके (रिसोर्स पर्सन, CBSE),
शालेय समितीचे सचिव सत्यवान सिंह दूहन,
संस्थेचे अध्यक्ष रणधीर सिंग दूहन
तसेच इतर शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून शहिद पर्यटकांप्रति आपला आदर व्यक्त केला. संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या घोषणांनी भारले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतांद्वारे शहिदांना अभिवादन केले. उपस्थित सर्वांनी दोन मिनिटांचे मौन पाळून शहिदांना आदरांजली वाहिली. शाळेत देशप्रेम, बलिदान आणि एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला.
