
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
यवतमाळ -येथील निवासी समाजसेविका वर्षा म्हैसकर यांची नियुक्ती यवतमाळ जिल्हा महिला आघाडी अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार यांचे आदेशानुसार अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका लेखी पत्रकार द्वारे केली आहे .वर्षा म्हैसकर मागील दहा वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून अन्याय त्याचा बेसारा लोकांना न्याय देण्याचं काम करीत असतात .आता त्यांना अखिल भारतीय धृततारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या वतीने यवतमाळ जिल्हा महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले असून त्या अपंग दिव्यांग, मूकबधिर ,कर्णबधिर, अंध लोकांना जोडून त्यांच्या समस्या शासन स्तरावर पोहोचण्याच्या काम करतील.
