
तालुक्यातील मुकूटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेची व्यवस्थापन समीती, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे कडून विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेच्या वतीने सांस्कृतिक वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत दररोज संध्याकाळी ६:०० ते १०:३० वाजेपर्यंत विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच आज रवीवारी ५ फेब्रुवारीला बक्षीस वितरण व भोजनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.
या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रमांची मेजवानी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्याना अनुभवता आली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी २ फेब्रुवारी संध्याकाळी ७:०० वाजता गणेशपुर ग्रामपंचायतचे सरपंच शुभांगी लोडे, गृहलक्ष्मी बहुउद्देशीय संस्था मुकूटबनच्या अध्यक्ष सुरेखा संजय आगुलवार, उपाध्यक्ष सुनिता प्रमोद पुंगूरवार, सचिव आरती वासुदेव मल्लुरवार, कोषाध्यक्ष लक्ष्मी संजय हुडे, संचालीका सारीका सुनील उत्तरवार, रंजना दिपक बरशेट्टीवार तसेच प्रमोद पुंड्रावार, संजय आगुलवार, सुनील उत्तरवार, संजय हुडे, दिपक बरशेट्टीवार, बाळू उर्फ वासुदेव मल्लुरवार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून पार पडले. त्यानंतर या शाळेतील शिक्षक शिवानंद महाजन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संध्याकाळी ७:४५ वाजता प्रथम देवता गणेश विनायक वर नृत्य सादर करून सांस्कृतिक महोत्सवाला लहान मुलांचे समुह नृत्य पासून सुरुवात करण्यात आली. हा सांस्कृतिक कार्यक्रम चार दिवस उत्साहात झाला आहे.गुरुवारी २ फेब्रुवारीला ३८ स्पर्धकांचे नृत्य घेण्यात आले. शुक्रवारी ३ फेब्रुवारीला सामाजिक समुह नृत्य व एकल नृत्य, शनीवारी ४ फेब्रुवारीला आई आणि विद्यार्थ्यांची स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा संध्याकाळी ६ ते १०:३० वाजेपर्यंत घेण्यात आल्या. आज रवीवारी ५ फेब्रुवारीला सकाळी ११:०० वाजेपासून बक्षीस वितरण व भोजनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.
