
सहांपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वनोजा येथील गजानन पंढरी नागपुरे हा ग्रामपंचायती मध्ये दहा वर्षांपासून शिपाई म्हणून नियमित काम करीत असताना ग्रामपंचायंतीच्या आकसापोटी शिपाई पदावरून कमी करण्यात आले असून नागपुरे यानी या बाबत जिल्हा परिषद तथा पंचायत समितीकडे कामावर घेण्यात यावे यासाठी अपील केली होती तेव्हा जिल्हा परिषदेच्या वतीने नागपुरे याना कामावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले होते मात्र ग्रामपंचायतीने अद्यापही गजानन नागपुरे याला कामावर रुजू करून घेतले नसल्याने त्यांनी आज दिं १८ मार्च २०२४ सोमवार पासून पंचायत समिती समोर पती पत्नी मुलां सह उपोषणला बसले आहे. गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीने सविस्तर चौकशी करून नागपुरे यांना कामावर घेण्याबाबत चे सुचना व आदेश दिले असून तीन महिनेचा कालावधी लोटूनही सुद्धा नागपुरे यांना कामावरती रूजु करून घेतले नाही किंवा रूजू करण्याबाबत तसे काही पत्राद्वारे काही कळविले नाही.
नागपुरे यांच्या कडे कुटुंब उदरनिर्वाहा करिता कोणत्याही प्रकारची शेती नाही तसेच गरिब कुटूंबातील असल्यामुळे त्यांच्याकडे सोर्स नसल्यामुळे माझी व माझ्या परिवाराची उपजिवीका नोकरीवर होती मात्र ग्रामपंचातिच्या आकसापोटी मला कामावरून काढले त्यामुळे माझ्या कुटूंबावर उपास मारीची वेळ आली आहे.
तेव्हा मला ग्रामपंचायतीने आठ दिवसात कामावर रूजू करून घेतले नाही तर आमरन उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे उपोषण कर्त्याना सांगितले असून याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
