
नगरपंचायत राळेगाव राबवित असलेले प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प दोन सर्वसाधारणपणे सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणारी पात्र घरकुल लाभार्थी कुटुंबे यांच्या घराची मोजणी सर्वेक्षण व मालकी चा प्रश्न गेल्या चार वर्षापासून रखडलेला आहे लाभार्थी कुटुंबाकडे घराची मालकी पट्टा नसल्यामुळे लाभार्थी कुटुंबालायोजनेचा लाभ घेता येत नाही प्रधानमंत्री आवास संघर्ष समितीकडून लाभार्थी कुटुंबाच्या घराची मोजणी सर्वेक्षण व मालकीसाठी अनेक स्तरावरून सातत्याने प्रयत्न करण्यात आले संघर्ष समिती संयोजक शंकर गायधने यांच्या पुढाकारात उपअधीक्षक तालुका भूमि अभिलेख गवई यांची भेट घेऊन या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली उपाधीक्षक तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडे प्राप्त जवळपास 350 प्राप्त घरकुल मोजणी प्रस्ताव फी चार लाख अठरा हजार पैकी नगरपंचायत कडून दोन लाख रुपये प्राप्त झाल्याची माहिती अधिकारी यांचेकडून देण्यात आली पाच दिवसात सरकारी जागेमधील घरकुल पात्र लाभार्थी यांच्या घराची मोजणी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याबाबत गवई उपाधीक्षक तालुका भूमी अभिलेख यांनी सहमती दर्शविली चर्चेत संघर्ष समिती सदस्य व लाभार्थी भानुदास वामन महाजन प्रभाकर धोटे लक्ष्मण पिंपरे लक्ष्मण डाखोरे सुधाकर शिखरे मनोहर बोडेकर इत्यादींनी सहभाग घेतला व निवेदन देण्यात आले प्रधानमंत्री आवास च्या सरकारी जागेवरील घर मोजणी व मालकी उतारे हा विषय प्रधानमंत्री आवास संघर्ष समितीकडून महाराष्ट्र शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत जनता दरबारात लावून धरण्यात आला होता जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन नगरपंचायत ला व तालुका उपाध्यक्ष भूमी अभिलेख कार्यालयाला याबाबतीत धारेवर धरण्यात आले होते आता संघर्ष समितीच्या प्रयत्नाने येत्या काही दिवसात घरकुल लाभार्थी कुटुंबाच्या घराची मोजणी सर्वेक्षण व मालकी बाबतीत मार्ग मोकळा झाला आहे.
