कापूस सोयाबीन अनुदानापासून शेतकरी वंचित . शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शासनाने ई पीक पेरवा2023 नोंद असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर कापूस व सोयाबीन पेरवा असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले आहे या योजनेअंतर्गत ज्यांचे सातबारावर 2023 चा ई पीक पेरवा नोंदविलेला आहे अशांना या योजनेचा लाभ होणार आहे अशातच तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी बांधवांच्या सातबारावर सन 2023 मध्ये पेरवा नोंदविला तरीही त्यांच्या सातबारावर पेरव्याचीनोंद झाली नसल्यामुळे असे अनेक शेतकरी लाभ यादीतून सुटले आहे अशा लाभापासून वंचित शेतकऱ्यांना तातडीने लाभ यादीत त्यांची नावे समाविष्ट करून लाभ देण्यात यावा या आशयाचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत शासनाला देण्यात आले यावेळी सुधीर पाटील जवादे अखिल भारतीय सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष यवतमाळ,
अशोक मारुती मेश्राम उमेदवार राळेगाव विधानसभा मतदारसंघ 77 सय्यद युसुफ अली
डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकरी संघ तालुका राळेगाव तसेच राळेगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधव यावेळी . उपस्थित होते.