
.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
तालुक्यातील
खैरी या गावात डेंग्यू या आजाराची सातत्याने रुग्ण संख्या वाढत असुन प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित केले होते.या वृत्ताची दखल घेत गावात डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारी संपूर्ण तालुक्याची आरोग्य यंत्रणा व स्थानिक ग्राम पंचायत प्रशासन दिवसभर तळ ठोकून होते.या आरोग्य पथकांकडून गावातील प्रत्येक घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून डेंग्यूच्या मच्छरांच्या उत्पत्तीचे स्थान नष्ट करण्यात आले..
गेल्या जुन महिन्यांच्या सुरवातीपासून खैरी येथे डेंग्यू या आजाराची लक्षणे असलेली दोन रुग्ण आढळून आले होते.तेव्हापासुन गावात सातत्याने हि रुग्ण संख्या वाढतच गेली.आजच्या घडीला खैरी येथे डेंग्यू या आजाराचे जवळपास २० ते २५ एक्टिव्ह रुग्ण असुन आरोग्य विभागाकडून कुठल्याही उपाययोजना होत नसल्याचे व स्थानिक ग्राम पंचायतीचे साफसफाईकडे साफ दुर्लक्ष होत असल्याची बातमी २२ जुलै रोजी दैनिक देशोन्नतीने प्रकाशित केली होती.या वृत्ताची दखल घेत ग्राम पंचायतीने संपूर्ण गावात धुळफवारणी सुरू केली असून आज सोमवारी २६ जुलै रोजी संपूर्ण आरोग्य विभागाची टिम खैरी गावात तळ ठोकून होती.दहेगांव उप आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष बरगट यांच्या सह आरोग्य विभागाचे व्हि एस.काकडे, रामटेके,बोरपे,बी.एस.क्षिरसागर,रश्मी साठोणे, करिष्मा नरडे, आरोग्य सेविका एच.बी.गलाट,आशा गटप्रवर्तक वनिता चौधरी, अश्विनी वाढई, योगिता मुडे यांच्या सह जवळपास चाळीस ते पन्नास आरोग्य कर्मचारी तसेच आशा वर्कर्स व ग्राम पंचायत खैरीचे ग्राम विकास अधिकारी थानेश्वर कडू,सरपंच सौ.किरण तशांत महाजन, उपसरपंच श्रीकांत राऊत, रविंद्र निवल तथा येथील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी गावातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून डेंग्यूच्या मच्छरांची उत्पत्ती होणारी स्थळ नष्ट केले.त्यामुळे सध्या तरी आरोग्य विभाग अर्लट मोडवर आल्याचे दिसून येत असून आठवड्यातून शनिवार हा एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असे आवाहन यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.अशिष बरगट यांनी येथील नागरिकांना केले. आष्टोना गावाकडेही लक्ष देण्याची गरज.
खैरीपासून काही अंतरावर असलेल्या आष्टोना या गावात डेंग्यूच्या पाच रुग्णांचे निदान झाले असुन त्यांचेवर वणी येथील सुगम हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.प्रामुख्याने या गावात देखील डेंग्यू या आजाराने लहान मुलांनाच लक्ष केले आहे.त्यामुळे आष्टोना या गावात सध्या पालकांच्या मनात भितेचे वातावरण पसरले असुन ग्राम पंचायत प्रशासनासह आरोग्य विभागाने या गावाकडे देखील विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
