
उमरखेड (दि. १७ ऑगस्ट) तालुक्यातील सावळेश्वर येथे दिनांक 26 जून 2024 रोजी पैनगंगा नदीमध्ये दोन मुली पाण्यात बुडत असलेल्या पाहून कोणताही विचार न करता चेतन देवानंद कांबळे ह्याने पाण्यात बुडत असणाऱ्या दोन मुलीला वाचूवण्या करिता गेला असता दुर्दैवाने त्याचा सुद्धा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
व दोन मुली व एक मुलगा मरण पावल्यामुळे सावळेश्वर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
चेतन ची ही आई विधवा आणि दोन बहिणी त्यात एक बहीण अपंग असल्यामुळे घरातील सर्व जबाबदारी चेतन वर पडली होती, पण चेतन गेल्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती.त्यामुळे गावाचे पोलीस पाटील अनिल कांबळे यांनी आदर्श गाव या सावळेश्वर येथील व्हाट्सअप ग्रुपवर एसएमएस करून नागरिकांना आव्हान केले की आईला मदत करावी.
हा एसएमएस उमरखेड शहरातील निर्भीड निस्वार्थी पत्रकार सिद्धार्थ ओमप्रकाश दिवेकर यांच्याकडे पोहोचल्याने तात्काळ दैनिक प्रबुद्ध परिवार, दैनिक सचित्र न्यूज व इतर अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून “आईला मदत करा” ही बातमी व्हायरल झाल्यामुळे चेतनच्या आईला एक लाख 11 हजार दोनशे रुपयाची मदत झाली.
एक लाख लाख रुपयाची एफडी चेतनची बहीण तेजल हिच्या नावे करण्यात आले व उर्वरित अकरा हजार दोनशे रुपयांचा किराणामाल चेतनच्या आईला सुपूर्त करण्यात आला.
ही मदत पाहून या आईच्या डोळ्यात अश्रू थांबले नाहीत.
यावेळी अनिल कांबळे पोलीस पाटील चिंतामणजी काळबांडे, विवेक रावते, शिवाजी काळबांडे. तंटामुक्ती अध्यक्ष सिद्धार्थ काळबांडे, शेख आजार, अरविंद रावते इत्यादी अनेक गावातील मंडळी उपस्थित होती.
