कॉलेजची फि न भरल्यामुळे त्याचा पेपर हिसकावून घेतल्याने अनिकेतने गळफास लावून आत्महत्या ,फि वसूली साठी खाजगी शिक्षण संस्थाचा मनमानी कारभार

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

    

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील विध्यार्थी अनिकेत अशोक निडगुरवार वय वर्षे २० हा बडनेरा येथे माजी मंत्री वसुधा देशमुख कॉलेज मध्ये बि.टेक अंतिम वर्षाला शिकत होता अनिकेतने कॉलेजची फी न भरल्यामुळे त्याचा पेपर हिसकावून घेतल्याने अनिकेतने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अनिकेतच्या वडिलांनी वसुधा देशमुख कॉलेज बडनेरा यांच्या विरोधात बडनेरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सदर अनिकेतचे वडील अशोक निडगुरवार हे अल्पभूधारक शेतकरी असुन अशोकला दोन मुली व एक मुलगा अनिकेत एका मुलीचे लग्न कोराना महामारीच्या काळात झाले व दुसऱ्या मुलीचे लग्न जुळले आहे. दोन वर्षे कोरोना महामारीचे संकट व सततच्या ना पीकी मूळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे थोडे कठीण जात होते. दुसऱ्या मुलीच्या लग्नाची जुळवाजुळव चालू होती तर अशातच मुलाचा अंतिम वर्षाचा बि.टेक इंजिनिअरिंग चा पेपर चालू होता तर अनिकेतने वडिलांना फोन केला बाबा शिक्षक मला पैशासाठी खूप तगादा लावत आहे. तुम्ही लवकर मला पैसे पाठवून द्या नाही तर मला उद्याला पेपरला बसु देणार नाही असे सांगुन अनिकेतने फोन बंद केला तर वडिलांनी पैशाची जुळवाजुळव करून दुसऱ्या दिवशी अनिकेतला पैसे पाठवणार तर दुसऱ्या दिवशी बडनेरा पोलिस स्टेशन मधून फोन आला की तुमच्या मुलानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सदर माझ्या मुलाला वसुधा देशमुख कॉलेजच्या बडनेरा येथील शिक्षकाने पेपरला बसु न दिल्याने माझ्या मुलानी गळफास लावून आत्महत्या केली असल्याची तक्रार बडनेरा पोलीस स्टेशनला दिली असून सदर अनिकेत हा एकच मुलगा असल्याने निडगुरवार परिवारावर मोठे दुखः चे डोंगर कोसळले आहे अनिकेतच्या निधनाने रिधोरा येथे शोकाकुल वातावरण पसरले आहे. सदर ही घटना अमरावती जिल्ह्यात जरी घडली असली तरी यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा खाजगी शाळाच्या फी वसूलीच्या तगादा पायी विद्यर्थी सह पालक मेटाकुटिस आला आहे. शिक्षण विभागानाने वेळीच मुसक्या आवळल्या नाही तर जिह्यात दुर्दवी प्रकार घड़ण्याची शक्यता नाकरता येत नाही.
प्रतिक्रिया माझा मुलगा बडनेरा येथे वसुधा देशमुख महाविद्यालय येथे बि.टेक इंजिनिअरिंग अंतिम वर्षाला होता मला कॉलेज मधून फोन आला की तुमच्या मुलाचे पैसे भरा म्हणून तर मी दुसऱ्या दिवशी पैसे पाठवणार तर मला बडनेरा पोलीस स्टेशन मधून फोन आला की तुमच्या मुलानी गळफास लावून आत्महत्या केली
अशोक निडगुरवार रिधोरा अनिकेतचे वडील