
K
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक उत्कृष्ट प्रशासक रणनिती कार बहुजन प्रतिपालक व रयतेचे राजे होते असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून पहिले पुष्प गुंफताना तहसीलदार डॉ रविंद्र कुमार कानडजे यांनी केले . दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते . या वर्षी शिवतीर्थ या नवीनस्थळी आयोजन केले होते सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तहसीलदार डॉ कानडजे होते . प्रमुख उपस्थिती नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानरावभाऊ गिरी ,अशोकराव राऊत, विजयराव तायडे ,नंदकुमारभाऊ गांधी उपस्थित होते . प्रतिमा पूजनानंतर उपस्थित पाहुण्यांनी शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन विचार व्यक्त केले दुपारी बारा वाजता शहराच्या प्रमुख मार्गाने बाईक रॅली काढून महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन पूजन केले . सायंकाळी पाच वाजता शाळकरी मुलांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली यातील स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले यात शहरातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता . यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने राळेगाव नगरपंचायत मध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्वच नगरसेवकांचा जाहीर सत्कार घेण्यात आला . सत्कार कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य कृष्णाजी पाल सामाजीक कार्यकर्ते इब्राहीम बब्बर उपस्थित होते .यावेळी सत्काराला उत्तर देताना उपनगराध्यक्ष जानराव गिरी म्हणाले आम्ही छत्रपतीच्या विचारांनी प्रेरित झालेले आहोत एक भव्य अश्वारूढ पुतळा महाराजांचा या जागेवर व्हावा नगर पंचायत पूर्णता आयोजन समितीच्या सोबत राहील असे सांगितले . या कार्यक्रमानंतर ‘छत्रपती रयतेचे राजे: या विषयावर रुपेश रेंगे ग्रामगीताचार्य झाडगाव यांनी प्रबोधन केले छत्रपतींचा काळ किती कठीण छत्रपतींवर झालेले संस्कार आजच्या आईनी मुलावर करावे हे त्यांच्या प्रबोधनातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले व्याख्यानानंतर शाहीर गजानन वानखेडे यवतमाळ यांच्या संचाने पोवाड्याच्या कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण केले . पोवाड्याच्या कार्यक्रमाने छत्रपतींचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे या संचाने काम केले सर्वच कार्यक्रमाचे आयोजन शिवतीर्थ यास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळील जागेत करण्यात आले होते . या भव्य कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते . आयोजन समितीने सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे जाहीर करून सहकार्या बद्दल आभार व्यक्त केले.
