
प्रतीनिधी:प्रवीण जोशी, ढाणकी
भारतमातेचे सुपुत्र शहीद अब्दुल हमीद यांचा आज शहीद दिन त्या निमित्ताने गजानन आजेगांवकर व अन्सारभाई यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. शहीद अब्दुल हमीद यांनी आजच्याच दिवशी १० सप्टेंबर १९६५ ला भारत पाकिस्तान युध्दाच्या वेळी ९ टँक मातीत मिळवुन कितीतरी पाकिस्थानी फौजेचा खात्मा केला होता व ऐतिहासिक विजय भारताला मिळवुण दिला होता त्याच सुपुत्राचा आज शहीद दिन म्हणून त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार व अभिवादन करुन साजरा करण्यात आला.
