स्मशानभूमी नसल्याने,अंत्यविधीप्रसंगी ग्रामस्थांचे होत आहे खूप हाल… आता पर्यंत फक्त आश्वासनांची खैरात

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज गुजरी येथे शेवंताबाई बापूराव वाघाडे यांचे निधन झाले.त्यांचा अंत्यविधी त्यांच्या शेतात करण्यात आला.तो पण 40गुंठे वाटणीस येणाऱ्या शेतात उभ्या पिकात येणं पीक जोमात असतांना..त्यातील कितीतरी झाडानां आस लागली असावी.कसं बस वाट्याला असणाऱ्या शेतातलं हाती येणारं पीक आजचं गेलं.खरं खूप वाईट चित्र आहे.हे सगळं का बरं झाल? कारण गावाला आजपर्यंत स्मशानभूमी नाही.ग्रामस्थानां जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार करावे लागते.आज शेतात चिखल तुडवत पँट खोसुन अंत्यसंस्काराला जावे लागले.हे आजचं नाही असे कित्येक वर्षानुवर्ष पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यविधीला गावोगावचे लोकं येत असतात.मृत्युनंतर विटंबना केली जाते.गुजरी या गावी 0.40आर जागा असतांना हि इथे स्मशानभूमी होतं नाही हे दुर्दैव.दि.13/08/2021रोजी स्मशानभूमी साठी नियोजित जागेच्या ठरावानुसार आरक्षित जागा म्हणून फलक लावण्यात आला.जागा जुनीच नवीन ठरावासह फलक लावण्यात आला.जागा नाही नेहमी कांगावा सुरू होता 7/12ल्या नोंद असतांना सुध्दा नुसती आजपर्यंत चालली होती जागा शोध.आझादी चा अमृत महोत्सव पार पडला तरी आमच्या गावचा विकास आणि प्रगती काहीसे दिसेना.विकास नाही आला तरी प्रगती मात्र पूर्ण झाली अशी काहीसं झाल गावच..(आदर्शगाव )गावात रस्ता आणि स्वतःची स्मशानभूमीची समस्या कित्येक वर्षांपासून आहे..स्वातंत्र मिळुन 75वर्ष पूर्ण झाले तरी हया दोन समस्या काही सुटेना.रस्ता तर इतका खराब जनावर सुध्दा चालण्यास तयार नाही. शंभरी ओलांडण्यावर होईल का स्मशानभूमी असे काही लोकं म्हणू लागले.गुजरी येथील जनता त्रस्त होऊन झालेल्या गोष्टीस प्रशासन जबाबदार आहे असे म्हणत.आज गावाच्या सभोवताल अंत्यविधी करण्यात येते असा एकही रस्ता सुटला नाही तिकडे अंत्यविधी झाला नाही.पावसाळ्यात डिझेल टायरच्या मदतीने चिता पेटवली जाते.पावसाने मेहरबानी दाखवली आणि थांबला काही वेळे पुरता म्हणून अंत्यविधी करण्यात आला.माझा म्हणणं इतकं आहे प्रशासनाला.. जागा उपलब्ध आहे तरी आपण स्मशानभूमी करीता बांधकाम,कुंपण व इतर सोयी करीता निधी लवकरात लवकर उपलब्ध करून दयावा.तसे आम्हाला तोंडी आश्वासन दिले आहे डिसेंबर पर्यन्त निधी देतो.परंतु हे लिहिण्याचं मागचं कारण असं की आज जे पाहिलं अनुभवलं ते प्रशासन, तालुका नेत्यांना व वरच्या पातळीच्या नेत्यांना हि बाब पुन्हा एकदा लक्षात आणून देण्याचा अल्पसा प्रयत्न.
समस्या जरी असली भीषण
तरी चालु ठेवु पाठपुरावा मिशन असाच निर्धार गुजरी ग्रामस्थांनी केला आहे हे विशेष.