खैरी येथे तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या    


राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील खैरी येथील तरुण युवक किशोर गणपत राऊत वय अंदाजे ४५ वर्ष  तरुण युवकाने सात सप्टेंबर रोज बुधवार ला स्वतःच्या घरामध्ये विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली. हा युवक रोजमजुरी करून आपले घर चालवीत होता बुधवार ला  घरी कोणीही नसताना  तरुणाने विषारी कीटकनाशक प्राशन केले. ही बाब काही वेळानंतरआजूबाजूच्या शेजाऱ्या ना  विष प्राशन केल्याचे लक्षात येताच उपचाराकरिता राळेगाव येथे हलविण्यात आले मात्र विषारी कीटक नाशक जास्त प्रमाणात पिल्यामुळे व काही वेळ घरीच असल्यामुळे वेळ निघून गेला व वाटेतच मृत्यू झाला त्यानंतर राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करिता नेण्यात आले तर कीटक नाशक प्राशन केलेल्या इसमास मृत घोषित करण्यात आले. किशोर याचे मृत्युपच्यात पत्नी व दोन लहान मुली आहेत. त्याच्या अशा अकस्मात मृत्यूने खैरी गावात शोककळा पसरली. किशोर हात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता अचानक आत्महते सारखे टोकाचे पाऊल उचलल्या मुळे राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वृत्त लिहेपर्यंत किशोर ने आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे.