विहिरींचे कुशल देयक तात्काळ द्या अन्यथा शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

7

ढाणकी/प्रतिनिधी : प्रवीण जोशी.

ढाणकी येथील ग्रामपंचायत अंतर्गत शेतकऱ्यांच्या विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून, पंचायत समिती मार्फत त्यांना अकुशल कामाची रक्कम पूर्ण मिळाली. त्यानंतर ढाणकी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने, कुशल कामाचा निधी रखडला. तो निधी तत्काळ देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
महात्मा गांधी ग्रामरोजगार योजनेअंतर्गत, वैयक्तिक विहिरीचे खोदकाम शेतकऱ्यांनी केले तेव्हा त्यांना, कुशल कामाचे देयक देण्यात आले. मात्र ढाणकी शहराला २ मार्च २०१९ ला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने, अकुशल कामाचे देयक मिळाले नसल्याने, लाभधारक शेतकऱ्यांनी अनेकदा गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत निवेदने दिली. त्यावर त्यांनी मनरेगा आयुक्त नागपूर यांच्याकडे मागणी देखील केली. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात अकुशल कामाचे देयके जमा न झाल्याने, शेतकरी हतबल झाला आहे. एकीकडे अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी, अकुशल कामाच्या देयकामध्ये अडकला असल्याने, त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अकुशल कामाचा मोबदला द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी ढाणकी येथील दशरथ मंतेवाड, मुखिरवाड, मारोती बिटेवार, अशोक येरावार, शेषेराव राठोड आदी शेतकरी बांधव उपस्थित होते
.