

वरोरा :- तालुक्यातील करंजी येथील वर्धा नदीच्या घाटावर रेती तस्कर अवैधरित्या रेतीचे उत्खनन करीत आहे , या उत्खननाची माहिती पोलीस विभागाला मिळतअसते, काल दि. 22 जानेवारीला सायंकाळी आठच्या सुमारास ट्रॅक्टर मालक मोईन थैम अंदाजे वय 45 वर्ष यावर कारवाई करित साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
अनेक वर्षापासून वरोरा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात घाट लिलाव न झाल्याने अवैध रेती तस्करी ला उधान आलेले आहे. या संदर्भात महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर नागरिक या संदर्भाची माहिती पोलीस विभागाला मिळते. पोलीस अधिकारी तालुक्यात होणाऱ्या अनेक अवैध गोष्टींवर अंकुश लावण्यासाठी प्रयत्नशील असतात. दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास गुप्त माहिती द्वारे करंजी येथील वर्धा नदीच्या घाटावर तीन ट्रॅक्टर अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. त्या आधारे पोलिसांनी वर्धा नदीच्या पात्रात MH34CD0640 व ट्राली क्रमांक MH34CD1055 या ट्राली मध्ये एक ब्रास रेती भरून असलेली दिसली. ट्रॅक्टर चालक-मालक अवैधरित्या पास परवाना नसताना रेती वाहतूक करताना मिळून आल्याने पोलिसांनी कलम 303 ( 2 ) बी एन एस सहकलम 48 महाराष्ट्र महसूल अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एकूण किंमत 6,55,000 चा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अयोमी साटम, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक ठाकरे, पोलीस हवालदार मोहन निषाद, संदीप मुळे, विशाल राजुरकर , महेश गावतुरे यांनी पार पाडली. अन्य दुसऱ्या ट्रॅक्टरची महिती पोलीस घेतं आहे त्या ट्रॅक्टर वर कारवाई होणार की नाही याबाबत परिसरात चर्चा आहे.
