
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सरकारणे अनेक घरकुल योजना काढल्या,
मोदी आवास, प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी, कोलाम समाजासाठी सुद्धा घरकुल योजना काढण्यात आली घरकुल योजनेचा पहिला हप्ता देखिल टाकला..
पण घर बांधकाम करण्यासाठी रेतीच नियोजन शुन्य, बाजूच्या वर्ध्यात जिल्यात रेती उपलब्ध मग यवतमाळ जिल्यात का नाही सामान्य घरकुल धारकांना कितीतरी पैसे जास्त देऊन रेती विकत घ्यावी लागत आहे, जे गरीब लोकांना परडवणार नाही..अनेकांना रेती अभावी , घरकुल कसे बांधावे यांचा प्रश्न भेडसावत आहे.सदर रेती प्रश्नावर तातडीने उपाययोजना करून घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून द्यावी अन्यथा घरकुल धारकांच्या आंदोलनाला सामोरे जावे कडक ईशारा देण्यात आला..सदर निवेदन मावळणी उपसरपंच मनिषा काटे (भोसले) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले..यावेळी अशोकराव उमरतकर, सुधाकरराव निखाडे, लक्ष्मण ढाले,सविता भोंडे(सरपंच सातेफल), अरुण शेंडे, कैलास शिवारे, रमेश दमाहे, योगिता गजबे, नितिन सूर्यवंशी,नाणी गजबे, प्रवीण थुटे, पवन कुटे, वैकुंठ कुटे, फिरोज पठाण, स्वप्नील नक्षणे, जगदीश मून, आदी उपस्थित होते
