
ढाणकी प्रतिनिधी प्रवीण जोशी
आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून देशाची धुरा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये याच विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे.देशावर नैसर्गिक संकट ओढवो वा परकीय आक्रमण येवो; अशा प्रसंगी हे विद्यार्थी आघाडीवर असतात. श्रमदान, रक्तदान करतात. जिवाची बाजी लावून अडचणींचे डोंगर पार करतात.परंतु काही विद्यार्थी जे मोबाइल, इंटरनेट,सोशल मीडिया यांमुळे यांच्या आहारी गेले आहे. त्यांचा स्वभाव बदलण्या मागे आजच्या मुलांच्या हातात आलेली साधनं असली, तरी बेसिक माहितीही त्यांना नसते ते फारसे वाचत नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होते. विद्यार्थ्यांच्या कला व गुणांना वाव मिळावा याकरिता संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य स्पर्धा परीक्षा भाविक भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड, यांच्या वतीने स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय ढाणकी येथे स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रतिसाद मिळाला या प्रसंगी स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय ढाणकी मुख्याध्यापक श्री जयस्वाल सर जाधव सर काईट सर चव्हाण सर सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद आणि कापसे, नागरगोजे, तसेच भाविक भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेडचे ढाणकी शहराध्यक्ष बंटी फुलकोंडावार विद्यार्थी संघटना तालुका उपाध्यक्ष डिंगाबर ब्रम्हटेके व पांडुरंग साखरे उपस्थित होते.या पुढे पण भाविक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्प फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा त्याकरिता तत्पर राहील असे भाविक भगत यांनी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकोत्तरवृंद यांना संबोधित केले.
