
पिक-विम्याचा लाभ न मिळाल्याने तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक
हिंगणघाट:- २४ नोव्हेंबर २०२३
हिंगणघाट- समुद्रपूर-सेलू तालुक्यातील तसेच संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील पिक विमा काढणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट लाभ देण्यात यावा या मागणी करीता शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदना व्दारे मागणी केली आहे.
सरकारच्या आदेशाप्रमाणे खरीपाच्या हंगामात सोयाबीन, कापुस, तुर इत्यादी पिकाचा १ रूपया भरून विमा काढला आणि उर्वरित रक्कम सरकारने भरून सोयाबीन, कापुस, तुर इत्यादी पिकांना विम्याचे कवच देवुन शेतक-यांना दिलासा दिला.
खरीपाच्या हंगामात नैसर्गिक वातावरणामुळे सोयाबीनच्या पिकावर बुरशिजन्य मर रोग आल्यामुळे पिक वाळुन गेले. त्यामुळे शेतक-यांनी शेतात गुरे – ढोरे सोडली. तर काही शेतक-यांनी रोटाव्हेटर मारून सवंगुन ख्रेशरने काढले त्यांना सवंगणीचा पैसा सुध्दा निवाला नाही. उलट लागवडीचा संपुर्ण खर्च शेतक-याच्या वाटयाला आला. जनावरासाठी कुटार तयार करून शेतक-याला समाधान मानावे लागेल. अशाप्रकारे शेतक-यावर आसमानी संकट आले.
सोयाबीनचे पिक वाळल्या नंतर शेतक-यांनी पिक विमा कंपनीकडे, कृषी विभागाकडे आणि ऑनलाईन तक्रारी केल्या. त्यानंतर पिक – विमा कंपनीचे प्रतिनिधी गावात येवून प्रत्येक ५००/- रूपयाची मागणी केली. काही शेतांची पाहणी केली आणि पुर्ण गावांची परिसराची पाहणी न करता निघुन गेले.
अशाप्रकारे पिक – विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतक-यांची अवहेलना केली. अशाप्रकारे शासनाची लक्तरे बेशिवर टांगुन शेतक-यांना पिक विमा मिळाला नाही.
काजळसरा येथिल १० शेतक-यांना पिक – विम्याचे पैसे मिळाले. उर्वरित ९० टक्के शेतक-यांना पिक – विम्याचा लाभ मिळाला नाही.
तरी काजळसरा व इतर गावातील संपुर्ण जिल्हयातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांना पिक विमा भेटला नाही. तरी त्वरीत सर्वकष चौकशी करून सोयाबीन उत्पादक शेतक-यांना पिक- विम्याचा सरसकट लाभ देण्यात यावा.त्यावेळी शेतकरी चोखारामजी डफ, नंदकुमार पिस्दूरकर, अरुणराव डफ, दिवाकर तेल्हांडे,मारुती पिस्दूरकर,हरिश्चंद्र डफ, रमेश उरकुडे,अशोक उरकुडे,दिनकर कचाटे,सुरेश विरुळकर,चंदूजी विरुळकर,दिनकरराव भाले,सुरेश कचाटे, अंबादास विरुळकर,भास्करराव भाले, अरुण डफ, गजानन मावसकर,देवराव देऊळकर,अरुण डफ,ज्ञानेश्वर वीरुटकर,गंगाधर पोटदुखे,वैशाली उरकुडे,नयन उरकुटे, भोजराज पिंस्दूरकर, महादेवराव गावस्कर, सुनील गावस्कर,गणपतराव विरुळकर,गोपाल विरुळकर,राजू पिंस्दूरकर,अर्चना पिंस्दूरकर, मनीषा उरकुडे,रमेश उरकुडे,नरेंद्र शेंडे,शांताराम पिंस्दूरकर, मारोतराव शेंडे,वसंतराव तेल्हांडे,सुधाकरराव कचाटे,रोशन तेल्हांडे,अशोक तेल्हांडे,डोमाजी तुंबडे,पुरुषोत्तम तेल्हांडे,चरणदास उईके, नथूजी डफ,हरिदास डफ,बंडूजी तेल्हांडे, भाविकदास तामगाडगे,दुर्गा कचाटे,पुरुषोत्तम तेल्हांडे, राजू तेल्हांडे,शेवंताबाई वैद्य,शालू डफ,अनिल विरुटकर,भालचंद्र डफ, गणपत पोटदुखे, राजू पिंस्दूरकर इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
