
सहसंपादक : रामभाऊ भोयर
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगाव व कळंब ई-आकार प्रकल्पाच्या वतीने आज दिनांक १३ जून २०२५ रोजी राळेगाव येथील पंचायत समितीच्या सभागृहात विशेष पालक सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी राळेगाव, प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रकाश मुसळे बाल विकास प्रकल्प अधिकारी कळंब हे होते. तसेच जिल्हा समन्वयक रॉकेट लर्निंग भुषण जुनगरे, भुमिका पेंदोर, पर्यवेक्षीका स्नेहा अनपट, धरती कोराम, पायल आत्राम इत्यादी मान्यवर उपस्थित होते,
सर्व प्रथम राजमाता जिजाऊमाता व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले, प्रकल्पांतर्गत अंगणवाडी स्तरावर पालकांचे व्हॉट्स अॕप गट तयार करण्यात आले असुन, त्यामार्फत दररोज दैनंदिन कृती तसेच होमवर्क व्हिडिओ पाठवले जाते.
या होमवर्क अॅक्टिव्हिटीच्या माध्यमातून अंगणवाडीतील ३ ते ६ वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.राळेगाव आणि कळंब तालुक्यातील एकूण २२ पालक असे होते की जे या ई-आकार व्हॉट्स अॕप गटांमध्ये नियमितपणे सक्रीय सहभाग नोंदवत होते. त्यांच्या सहभागाचे आणि योगदानाचे कौतुक करण्यासाठीच आजचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
तसेच या कार्यक्रमात पालकांनी आपल्या अनुभवांना वाट मोकळी करून दिली, तसेच पुढील काळातही मुलांच्या शिक्षणासाठी असेच सहकार्य करावे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या. निश्चितच हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल तसेच यामध्ये आहार आरोग्य बालकांचा व मातांचा सर्वांगिन विकास साधला जाईल असे प्रतिपादन सागर विठाळकर व प्रकाश मुसळे यांनी केले,
या सोबतच राळेगाव व कळंब तालुक्यातुन आलेले पालक, अंश आरती प्रफुल डोंगरे
यथार्थ प्रतिभा नंदू सहारे
श्रेयसी वर्षा आशिष निखाटे
अद्विक प्रांजली पंकज वातकर
अनिका अश्विनी अमोल केवटे
हितेश्री अश्विनी निकेश मेश्राम
शंतनु उज्वला पंकज मते
सात्विक प्रियांका गोविंदराव कावळे
श्याम पल्लवी संतोष वाघाडे
हार्दिक सुरेखा संतोष गुलाबे
कन्हैया नंदकिशोर अस्मिता कवटे
नायरा कल्याणी मनोहर भोयर
कृतिका नेहा आकाश नाकाडे
हृदय विजयश्री प्रफुल वनकर
गुंजन अमृता दिनेश देशमुख
युग स्वाती अमोल पाल
प्रश्विता प्रांजली आशिष धुर्वे
अनन्या सुरेश कन्नाके
रुजान सय्यद
गौरी कोडापे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.त्याचबरोबर ज्या पालकांचा सत्कार झाला तेथील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयाचे मोहन भोरे, शुभम ठाकरे, अक्षय रामगडे, दिपाली भगत,शिवानी मडावी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा अनपट यांनी केले तसेच प्रास्ताविक भुमिका पेंदोर तर भुषण जुनगरे यांनी सर्वांचे आभार मानले.
