महात्मा गांधी जयंती निमित्त राळेगाव नगरपंचायतच्या प्रांगणात कार्यक्रम

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथे २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनाच्या निमित्ताने बापू फाउंडेशनच्या वतीने एक दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन राळेगाव येथील नगरपंचायत समोर असलेल्या खुल्या प्रांगणात करण्यात आले सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांकडून प्रश्नमंजुषा घेऊन त्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला तर पुढे मुख्य प्रबोधन पर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून असलेले ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केलेल्या आपल्या दोन तासांच्या भाषणात महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर अनेक संदर्भ देत प्रकाश टाकून महात्मा गांधी यांचे विचार कसे देशाला पोषक आहे हे उपस्थित लोकांना पटवून दिले पुढे बोलताना त्यांनी आपल्या धारदार वाणीने बीजेपी सरकारवर जोरदार टीका केली हे सरकार लोकशाही विरोधी असून देशाचा नाश करणारे आहेत याच सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात खून, बलात्कार, अन्याय-अत्याचार वाढले आहे यांना आपण हद्दपार केले पाहिजे अशा शब्दात त्यांनी व्यथा मांडली पुढे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून असलेले माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पूरके यांनी देखील आपल्या भाषणात बोलताना सांगितले की बहुजनांना जागे व्हा अन्यथा काही खरे नाही 2014 पासून आपल्या देशात बीजेपी सरकार असून याच काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढले असून लोकशाहीचा खून करत भारतीय संविधानाची होळी करण्याचे, लोकशाही पायदळी तूडविण्याचे कटकारस्थान सुरू आहे नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे महागाई बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे हे लक्षात घेऊनच आता पुढील दिशा ठरविली पाहिजे असे प्रतिपादन वसंतराव पुरके यांनी उपस्थित लोकांना संबोधित करताना केले आहे यावेळी कार्यक्रमाला उपस्थित म्हणून नगरपंचायत चे नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गिरी, प्रदीप ठुणे, अरविंद वाडोनकर, अंकुश मुनेश्वर, नगरसेवक मंगेश राऊत, अप्सर ली सय्यद, राजेंद्र नागतूरे यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे प्रस्थाविक एडवो. किशोर मांडवकर यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार राजू रोहनकर यांनी केले