
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पा अंतर्गत व स्पेक्ट्रम फाउंडेशन वर्धा यांच्या मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (वरणा) येथे १ जुलै, २०२५ रोजी कृषी दिनाच्या निमित्ताने एक शानदार कार्यक्रम पार पडला
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्याकरिता योगदान आणि टिकाऊ कृषी विकास यांचे महत्त्व जाणून घेता आले व नंतर विद्यार्थ्यांनी जय जवान जय किसान चे नारे दिले.वड, नारळ व काही फुलझाडांची शाळेच्या शिक्षकांनी रचनात्मक जबाबदारी घेत विद्यार्थ्यांसोबत वृक्षांची लागवड केली. त्या नंतर स्पेक्ट्रम फाउंडेशन चे अधिकारी नरेश बाजरे यानी हानीकारक काम व बाल मजुरी बाबत माहिती दिली या कार्यक्रमाला स्पेक्ट्रम फाउंडेशन चे हितेश भोयर,लक्ष्मण येडस्कर,शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी व गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.