
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आपले सहभाग नोंदविले होते.
जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धा यवतमाळ मधील जाजू इंटरनॅशनल स्कूल मध्ये घेण्यात आले होते या स्पर्धेमध्ये 14 वर्षा आतील वयोगटामध्ये राळेगाव मधील जाजू इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील विद्यार्थी रेयाॅंश रणजीत मोकळे व विराज रुपेश बोरकुटे या दोघांनी आपली उत्कृष्ट खेळी करून पुसद व इतर शाळेंमधील विद्यार्थ्यांचे पराभव करून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये विजय नोंदविले व विभाग स्तरावर झेप घेतली.
विराज रुपेश बुरकुटे हे 14 वर्षाआतील प्रथम क्रमांकावर, तर रेयांश रणजीत मोकळे हे द्वितीय क्रमांकावर असून त्यांनी आपली मेहनतीची उत्कृष्ट कामगिरी दाखविली.
जिल्हास्तरीय स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, तालुका क्रीडा अधिकारी सचिन हरणे, जाजू संस्थांचे आशिष जी जाजू, शिल्पा आशिष जाजू, स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे जिल्हा सचिव गिरीराज गुप्ता हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या खेळाडूंनी आपले या यशाचे श्रेय त्यांचे पालक, शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक वृंद व त्यांचे प्रशिक्षक गिरीराज गुप्ता यांना दिले आहे.