विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व शारीरिक विकासासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गरजेचे : चित्तरंजन कोल्हे

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत अध्यक्ष स्व. शशिशेखर कोल्हे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक 18/1/2024 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वप्रथम स्व. शशिशेखर कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव कोल्हे जेष्ठ संचालक चित्तरंजन कोल्हे, उपाध्यक्ष आशिष कोल्हे,सचिव रोशन कोल्हे, संचालक शेखरराव झाडे, सुरेश गंधेवार, दिलीप देशपांडे,भरत पाल, गुलाबराव महाजन, प्रमुख पाहुणे सरपंच रामदास किन्नाके , पोलिस पाटील प्रशांत वाणी, वासुदेव तिजारे, गायधने यांनी स्व.शशिशेखर कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनर दुपारच्या सत्रात लखाजी महाराज विद्यालयातील व लखाजी इंग्लिश मिडीयम स्कूल झाडगावच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश टेंभेकंर सरांनी व वैशाली सातारकर मॅडम यांनी केले तर आभार दिगंबर बातुलवार सरांनी मानले .यामध्ये वर्ग 5 ते वर्ग 12 वीच्या विद्यार्थ्यांनी व लखाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 19/1/2024 रोज शुक्रवारला तालुका स्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष कोल्हे तर उद्घाटक म्हणून रोशन कोल्हे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विलास निमरड सर यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली .यामध्ये तालुक्यातील अनेक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयानी आपला सहभाग नोंदविला.यातून आपले उत्कृष्ट सादरीकरण करून आदिवासी आश्रमशाळा सावरखेडा यांनी 7000 रूपयाचे प्रथम बक्षीस स्व.शशिशेखर कोल्हे स्मृतिचिन्ह प्राप्त केले. तर द्वितीय क्रमांक सैनिक पब्लिक स्कूल वडकी यांनी मिळवून 5000 रूपयाचे बक्षीस व स्मृतिचिन्ह प्राप्त केले.तृतीय पुरस्कार 4000 रूपये व स्मृतिचिन्ह जिल्हा परिषद हायस्कूल वाढोणाबाजार यांनी प्राप्त केले तर चतुर्थ पुरस्कार 3000 रूपये व स्मृतिचिन्ह पौर्णिमा विद्यालय सावनेर यांनी प्राप्त केले. तर लखाजी महाराज विद्यालय झाडगाव यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रोत्साहनपर बक्षीस व स्मृतिचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भोयर सर, ऱंजय चौधरी सर यांनी केले तर आभार मोहन आत्राम सर यांनी केले. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी सतरा वर्षे वयोगटातील शालेय मुलामुलींच्या कब्बडी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांतील शालेय स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत मुलांच्या सामन्यात आदिवासी आश्रमशाळा सावरखेडा यांनी 10000 रूपयाचे रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.तर द्वितीय क्रमांक 7000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह सैनिक पब्लिक स्कूल वडकी यांनी प्राप्त केले.तृतीय पुरस्कार 5000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव यांनी प्राप्त केले. मुलींच्या कब्बडी खेळात प्रथम क्रमांक श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव यांनी 10000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह मिळविले. द्वितीय पुरस्कार 7000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह वसंत माध्यमिक विद्यालय पिंपळखुटी यांनी प्राप्त केले.तर तृतीय पुरस्कार 5000 रूपये रोख व स्मृतिचिन्ह इंदिरा गांधी महाविद्यालय राळेगाव यांनी प्राप्त केले. या खेळासाठी पंच म्हणून राळेगाव येथील नामांकित खेळाडू गजानन नाकाडे, रफिक शेख,राजू भटे, गजानन बोभाटे,सुयोग ठाकरे यांनी काम पाहिले.त्यांनी मैदानासाठी पंच म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल संस्थेकडून त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे हे होते. चित्तरंजन कोल्हे यांनी बोलताना विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व शारीरिक विकासासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.तर उदघाटक आशिष कोल्हे हे होते. बक्षीस वितरण, संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे व संस्थेचे सचिव रोशन कोल्हे व प्राचार्य विलास निमरड यांनी केले. तीन दिवसीय कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक नामवंत शाळांनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्राध्यापिका वंदना वाढोणकर मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक क्रीडा शिक्षक मोहन बोरकर यांनी केले तर आभार कब्बडी खेळाचे कोच श्रावनसिंग वडते सर यांनी मानले. हा तीन दिवसाचा सोहळा पार पाडण्यासाठी विद्यालयाचे सहायक शिक्षक विशाल मस्के, प्राध्यापिका कुंदा काळे, वाल्मिक कोल्हे,शुभम मेश्राम,पवन गिरी,दिपाली कोल्हे,रूचिता रोहणकर, अश्विनी तिजारे व इंग्लिश मिडीयम स्कूलमधील शिक्षिका काजल देवतळे, अश्विनी पापळकर, नम्रता रेंघे तथा शिक्षकेत्तर कर्मचारी बाबुलाल येसंबरे ,विनोद शेलवटे यांनी सहकार्य केले.हा कार्यक्रम तालुक्यातील ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावातील विद्यालयात झाल्यामुळे गावागावात पालकांत व विद्यार्थ्यांमध्ये आनंदी आनंद व्यक्त होत आहे. अशा एक ना अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात असल्याने या विद्यालयाकडे दरवर्षी विद्यार्थ्यांचे प्रवेशाबाबत झुकते माप दिसून येत आहे.