
सहसंपादक: रामभाऊ भोयर
खडकी येथील प्रणित अरुण जिवणे यांनी नुकतीच एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली त्याबद्दल त्यांचा आज सत्कार करण्यात आला यावेळी माजी प्राचार्य अरुणराव झोटिंग, प्राचार्य सुमेध भालशंकर, प्राचार्य लोमेश्वर सोनटक्के, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग, सोनटक्के मॅडम, राळेगाव तालुका खरेदी विक्री संचालिका राजश्री झोटिंग यांची उपस्थीती होती.
प्रणित चे वडील अरुण जिवणे हे शेतकरी असुन त्यांचे कडे आठ एकर शेती आहे त्यांनी खुप हलाकीच्या परिस्थितीत प्रनितचे वैद्यकीय शिक्षण पुर्ण केले, प्रणितने 62% गुण प्राप्त करुन एम बी बी एस पदवी प्राप्त केली.त्याचे खडकी ग्राम विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. देविदास तेलतुंबडे, अनिल जिवणे, ग्रा प सदस्या जयश्री तामगाडगे, पार्वताबाई आत्राम, सरपंच रजंना नाहाते,अंगणवाडी सेविका बबिता खैरे, आशा वर्कर किरण सोनटक्के हेमंत वभिटकर, ग्रामविकास अधिकारी राजेश ढगे,सुरेश आत्राम,नरेश तेलतुंबडे सेवानिवृत्त सि ई ओ, मुख्याध्यापक राजेश भोयर, सामाजिक कार्यकर्ते गोपाल मशरु,आशिष झोटींग, भास्कर पाटील, समीर झोटींग, रूपेश बागमार, विठ्ठल खोंडे,गजानन कोल्हे,भारत खैरे, मनोहर कुंभारे, यांचेसह खडकी गावात सर्वत्र कौतुक करण्यात आले
