आनंद निकेतन महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 6 सुवर्ण आणि 5 रौप्य पदक

        

गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली द्वारा आयोजित अमृत क्रीडा व कला मोहत्सव २०२३ मध्ये आनंद निकेतन महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 6 सुवर्ण आणि 5 रौप्य पदक प्राप्त केले. त्यामध्ये कब्बडी,खोखो या खेळामध्ये पुरुषांनी प्रथम क्रमांक पटकावला.खोखो महिला द्वितीय क्रमांक, रस्सीखेच(पुरुष/महिला)द्वितीय क्रमांक पटकावला. प्रफुल थुटे यांनी(२कि.मी. धावणे) – प्रथम क्रमांक, सौ हिना पांडे-मेहता (संगीत खुर्ची)- प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कब्बडी मध्ये प्रफुल थुटे आणि खो-खो मध्ये भूषण सूर्यवंशी यांना बेस्ट प्लेअर म्हणून सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे सांस्कृतिक स्पर्धेमध्ये लघु नाटिका (भूक) -प्रथम सामूहिक गीत (जोडो भारत)- द्वितीय
सौ हिना पांडे यांनी एकल नृत्य मध्ये प्रथम आणि गीत गायन मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
विद्यापीठाच्या सलग्नित सर्व महाविद्यालयांमधून आनंद निकेतन महाविद्यालय सर्वाधिक पुरस्कार घेणारे महाविद्यालय ठरले.हा अमृत कला व क्रीडा महोत्सव 27 ते 29 जानेवारी २०२३ ला गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली च्या क्रीडांगणावर घेण्यात आला होता.त्यासाठी विद्यापिठाअंतर्गत येणाऱ्या सर्वच महाविद्यालयातील
शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते.या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विजयी स्पर्धकांना प्राचार्य डॉ. मृणाल काळे , उपप्राचार्य प्रा.सौ.राधा सवाणे आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.