
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आमला येथील संत गजानन गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दिं.३० एप्रिल २०२५ रोज बुधवारला ग्रामगीता निर्माते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ११६ वी जयंती साजरी करण्यात आली असून सर्व प्रथम दीपप्रज्वलन करीत राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त भजन, सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना, राष्ट्रवंदना, जयघोष आदी धार्मिक कार्यक्रम घेऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी संत गजानन गुरुदेव सेवा मंडळाच्या सदस्या सौ. मीनाताई रमेश वाघ यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या केलेल्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित संत गजानन गुरुदेव सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष सुभाष गायधने, वसंत कुमरे संभाजी कन्नाके, नागोराव कुमरे, प्रशांत पांडे, विठ्ठल मेश्राम ,रमेश वाघ ,सुमन कुमरे, मंदाबाई न्याहारे ,चंदाबाई गायधने, मालाबाई कुमरे आदी होते तसेच गावातील नागरिक आदींनी सहकार्य केले.
