वडकी येथे वार्ड क्रं ४ मध्ये माजी जि प सदस्या प्रितीताई काकडे यांच्या प्रयत्नाने पाणीपुरवठायोजना , आमदार डॉ अशोक ऊईके यांच्या हस्ते लोकार्पण

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वडकी येथे गेल्या कित्येक वर्षापासून वडकी वॉर्ड क्र 4 बेघर वस्ती मध्ये पाण्याची समस्या होती. महिलांना लांबून लांबून पाणी भरावे लागायचे. त्यातही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांचे पाण्यावाचून खूप हाल व्हायचे तेव्हा या वस्तीतील महीला व नागरिकांनी त्यांची समस्या माजी जि प सदस्या सौ प्रीती काकडे यांना सांगितली तर त्यांनी महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यांना पाण्याची व्यवस्था करून देऊ असे आश्वासित केले.तर अखेर आपले आश्वासन पूर्ण करत कित्येक वर्षापासून पाण्यासाठी वंचित असलेल्या वॉर्ड क्र 4 मधील महीला ना पाण्याची व्यवस्था करून दिली.व मा.आमदार अशोक उईके यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.यासाठी ग्रामपंचायत वडकी प्रशासनाने सहकार्य केले, वार्ड क्रं ४ येथील सर्व रहिवाशांनी माजी जि प सदस्या सौ .प्रीती काकडे यांचे आभार मानत आनंद साजरा केला.